इय्योब १०:१४-२१
१४
मी जर पातक केले, तर तुमची नजर माझ्यावर आहे आणि माझ्या पापांबद्दल शिक्षा दिल्यावाचून राहणार नाही.
१५
जर मी दोषी असेन; तर माझा धिक्कार असो! मी निष्पाप असलो, तरीसुद्धा मी माझे डोके उंच करू शकत नाही, कारण मी लज्जेने व्याप्त झालो आहे आणि माझ्या दुःखात बुडून गेलो आहे.
१६
मी माझे मस्तक उंच करू लागलो, की तुम्ही सिंहासारखी मजवर झडप घालणार आणि पुन्हा तुमच्या अद्भुत शक्तीचे माझ्याविरुद्ध प्रदर्शन करणार.
१७
तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता, आणि आपला क्रोध माझ्याविरुद्ध वाढविता; तुमचे सामर्थ्य माझ्याविरुद्ध लाटांप्रमाणे एका पाठोपाठ येतात.
१८
“मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले? कोणीही मला पाहण्यापूर्वी मला मरण आले असते तर बरे झाले असते.
१९
मी जर कधी अस्तित्वातच आलो नसतो, किंवा गर्भाशयातून सरळ कबरेत गेलो असतो तर किती बरे असते!
२०
माझ्या थोड्या दिवसांची समाप्ती अजून झाली नाही का? मला आनंदाचे क्षण उपभोगायला मिळावे म्हणून माझ्यापासून दूर जा;
२१
म्हणजे जिथून परत येणे होत नाही, जे अंधार आणि मृत्यूचे स्थान, अशा ठिकाणी जाण्यापूर्वी,
Settings