Skip to content
इय्योब १०:१८-२२

मृत्यूपूर्वी थोडी विश्रांती मिळावी म्हणून विनंती

इय्योब १०:१८-२२
१८
“मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले? कोणीही मला पाहण्यापूर्वी मला मरण आले असते तर बरे झाले असते.
१९
मी जर कधी अस्‍तित्‍वातच आलो नसतो, किंवा गर्भाशयातून सरळ कबरेत गेलो असतो तर किती बरे असते!
२०
माझ्या थोड्या दिवसांची समाप्ती अजून झाली नाही का? मला आनंदाचे क्षण उपभोगायला मिळावे म्हणून माझ्यापासून दूर जा;
२१
म्हणजे जिथून परत येणे होत नाही, जे अंधार आणि मृत्यूचे स्थान, अशा ठिकाणी जाण्यापूर्वी,
२२
जे मध्यरात्रीच्या काळोखासारखे आहे, तिथे गाढ अंधकार व अव्यवस्था आहे, आणि तेथील प्रकाश सुद्धा अंधकारासारखा असतो.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options