Skip to content
यिर्मयाह ८:८-१२

खोट्या ज्ञानाचा मूर्खपणा

यिर्मयाह ८:८-१२
“ ‘तुम्ही कसे म्हणू शकता, “आम्ही बुद्धिमान आहोत, कारण आमच्याकडे याहवेहचे नियम आहेत,” खरेतर लेखनिकाच्या खोट्या लेखणीने याचा विपर्यास केला आहे?
बुद्धिमान लज्जित केले जातील; त्यांची त्रेधा उडेल आणि ते सापळ्यात अडकतील. कारण त्यांनी याहवेहचे वचन झिडकारले आहे, त्यांना कशाप्रकारचा शहाणपणा असेल?
१०
यास्तव मी त्यांच्या स्त्रिया इतर पुरुषांना देईन आणि त्यांची शेतीवाडी नवीन मालकांना देईन. त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लोभी आहेत; संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, कपटी व्यवहार करतात.
११
माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात की जणू ते फारसे गंभीर नाही. “शांती, शांती आहे,” असे ते म्हणतात, परंतु शांती कुठेही नाही.
१२
त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; त्यांना शिक्षा मिळेल तेव्हा त्यांचे पतन होईल, असे याहवेह म्हणतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options