Skip to content
यिर्मयाह ८:१३-१७

आसन्न आक्रमण

यिर्मयाह ८:१३-१७
१३
“ ‘मी त्यांचे पीक काढून घेईन, याहवेह घोषित करतात द्राक्षलतेला द्राक्ष नसतील, झाडांवर अंजीर फळ दिसणार नाही, त्यांची पाने सुद्धा वाळून जातील. मी त्यांना जे काही दिले आहे त्यांच्यापासून परत घेतले जाईल.’ ”
१४
आम्ही इथे का बसलो आहोत? एकत्र होऊ या! आपण तटबंदीच्या शहरात पलायन करू आणि तिथेच मरू! कारण आमच्या याहवेह परमेश्वराने आमचा नाश होण्यासाठी आम्हाला टाकून दिले आहे आणि त्यांनी आम्हाला विषारी पाणी पिण्यासाठी दिले आहे, कारण आम्ही त्यांच्याविरुद्ध पाप केले आहे.
१५
आम्ही शांतीची आशा करीत होतो, परंतु चांगले काही लाभलेच नाही, आरोग्य मिळण्याच्या वेळेची आशा करीत होतो, केवळ भयंकर दहशत मिळाली.
१६
दान इथून शत्रूच्या घोड्यांचा फुरफुरण्याचा आवाज येतो; घोड्यांच्या मोठ्या किंकाळण्यांनी सर्व भूमीवर थरकाप उडाला आहे. ते भूमी आणि त्यात जे काही आहे, हे नगर आणि जे सर्व इथे राहतात, ते सर्वनाश करण्यासाठी आले आहेत.
१७
“पाहा, मी तुमच्यामध्ये विषारी फुरसे सर्प पाठवेन, असे सर्प ज्यांना तुम्ही मंत्रमुग्ध करू शकणार नाही. आणि ते तुम्हाला दंश करतील,” याहवेह असे घोषित करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options