यिर्मयाह ८:४-८
४
“त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘जेव्हा लोक पडतात, तेव्हा ते पुन्हा उठत नाहीत काय? जेव्हा कोणी रस्ता चुकला असेल, तर तो मागे फिरत नाही काय?
५
मग हे लोक परत का वळले नाही? यरुशलेम नेहमी बंडखोरी का करते? ते कपटाला चिकटून राहिले आहेत; ते वळण्यास कबूल होत नाहीत.
६
मी त्यांचे लक्षपूर्वक ऐकले आहे, परंतु ते योग्य ते बोलत नाहीत. त्यांच्यातील कोणीही आपल्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करीत नाही, असे म्हणत नाही की “हे मी काय केले?” प्रत्येकजण आपल्या निवडलेल्या मार्गाचा पाठपुरावा करतो जणू एखादा घोडा युद्धात धाव घेतो.
७
आकाशातील करकोचाला तिचे निवडलेले ऋतू माहीत आहे, आणि तसेच कबुतर, बगळा व निळवी देखील त्यांच्या स्थलांतराच्या वेळेकडे लक्ष ठेऊन असतात. परंतु माझ्या लोकांना माहीतच नाही याहवेहच्या काय अपेक्षा आहेत.
८
“ ‘तुम्ही कसे म्हणू शकता, “आम्ही बुद्धिमान आहोत, कारण आमच्याकडे याहवेहचे नियम आहेत,” खरेतर लेखनिकाच्या खोट्या लेखणीने याचा विपर्यास केला आहे?
Settings