Skip to content
यिर्मयाह ७:२०-२६

यिर्मयाह ७:२०-२६

२०
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी माझा कोप आणि माझा क्रोध मी या जागेवर ओतेन—लोक, पशू, वृक्ष, आणि रोपे भस्मसात होतील—आणि तो अग्नी भडकेल व तो न शमणार नाही.
२१
“ ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: जा पुढाकार घ्या, तुमची होमार्पणे इतर अर्पणात टाका व ते मांस तुम्हीच खा!
२२
तुमच्या पूर्वजांना मी इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना केवळ होमार्पणे व यज्ञार्पणे याविषयीच आज्ञा दिली नव्हती,
२३
पण मी अशी आज्ञा दिली होती की: माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी सांगतो ते सर्व पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल.
२४
पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.
२५
तुमच्या पूर्वजांनी इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून आजपर्यंत, दिवसेंदिवस, पुन्हापुन्हा मी माझे संदेष्टे पाठवित राहिलो.
२६
परंतु त्यांनी माझे ऐकले नाही व माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते हेकेखोर होते व त्यांच्या पूर्वजांहून त्यांनी अधिक दुष्टाई केली.’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options