Skip to content
यिर्मयाह ५१:१-१३

यिर्मयाह ५१:१-१३

याहवेहचे म्हणणे हे असे आहे, “बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांवर चाल करून जाण्यास मी एका संहारक आत्म्याला प्रेरित करेन.
त्यांना पाखडण्यात यावे व त्यांच्या भूमीचा विध्वंस व्हावा म्हणून मी बाबेलविरुद्ध विदेशी लोकांना पाठवेन; तिच्या विनाशाच्या दिवशी ते प्रत्येक दिशेने तिच्या विरोधात येतील.
तिच्या सैनिकांना त्यांचे धनुष्य ताणू देऊ नका. तिच्या योद्ध्यांची चिलखते अंगात घालू देऊ नका. त्यांच्या तरुणांनाही सोडू नका; त्यांच्या सैन्याचा संपूर्ण नाश करा.
बाबेलमध्ये ते मरून पडतील. तिच्या रस्त्यांवर ते मरणोप्राय जखमी होतील.
त्यांची भूमी इस्राएलच्या पवित्र परमेश्वरासमोर जरी तिच्या अपराधाने भरलेली आहे तरीही त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेह यांनी इस्राएल व यहूदीयाचा त्याग केला नाही.
“बाबेलमधून पलायन करा! आपला जीव वाचविण्यास पळा! तिच्या पापांमुळे तुम्ही तुमचा नाश करून घेऊ नका. हा याहवेहचा सूड घेण्याचा समय आहे; ज्यास ती पात्र आहे, त्याचा मोबदला ते तिला देतील.
बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; म्हणून आता ते वेडे झाले आहेत.
बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल. तिच्यासाठी विलाप करा! तिच्या वेदना जाण्यासाठी औषध आणा; कदाचित ती बरी होऊ शकेल.
“ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते. पण ती बरी होऊ शकत नाही. आपण तिला सोडून आपल्या देशात परत जाऊ या. कारण तिचा न्याय आता आकाशापर्यंत पोचला आहे, तो स्वर्गाच्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.’
१०
“ ‘याहवेहने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे; चला, आपण सीयोनात जाऊन सांगू आमचे परमेश्वर याहवेहने काय केले आहे.’
११
“बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.
१२
बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.
१३
तुम्ही, जे बऱ्याच जलाशयाकाठी वास करता, आणि अतिसंपन्न आहात, तुमचा अंत जवळ आला आहे, तुमचा नाश होण्याचा समय आला आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options