यिर्मयाह ५०:३९-४६
३९
“म्हणून या नगरीत वनपशू व तरस वास करतील, व घुबडे येऊन राहतील. येथे आता पुन्हा कधी मानवाची वस्ती होणार नाही; किंवा ही नगरीत पिढ्यान् पिढ्या ओसाड पडेल.
४०
याहवेह जाहीर करतात, जसा मी परमेश्वराने सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश केला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही. त्यात लोक वस्ती करणार नाहीत.
४१
“पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; पृथ्वीच्या शेवटापासून एक मोठे राष्ट्र व अनेक राजे भडकविले जात आहेत.
४२
त्यांचे सैनिक धनुष्ये व भाल्यांसहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर व दयाहीन आहेत. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे बाबिलोन कन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.
४३
बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. त्याचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी त्याला ग्रासले आहे.
४४
यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्या सिंहाप्रमाणे, बाबेलच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”
४५
बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. बाबेलच्या लोकांच्या भूमीविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.
४६
बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल.
Settings