मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह ५०:२१-३२

पृथ्वीचा हातोडा मोडला

यिर्मयाह ५०:२१-३२
२१
“मराथाईम प्रदेशावर आक्रमण करा आणि पकोड येथील रहिवाशांवर स्वारी करा. त्यांचा पाठलाग करा, त्यांचा वध करा व त्यांना समूळ नष्ट करा.” असे याहवेह जाहीर करतात. “मी तुम्हाला आज्ञापिलेले सर्वकाही करा.
२२
देशामध्ये रणगर्जनेचा ध्वनी ऐकू येत आहे. प्रचंड विध्वंसतेचा ध्वनी!
२३
कसा मोडणारा व चुराडा करणारा संपूर्ण पृथ्वीतलावरील अत्यंत जबरदस्त असा हा हातोडा! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड बनले आहे!
२४
अगे बाबिलोन, मी तुझ्यासाठी सापळा लावला आणि तुला कळण्या आधीच तू त्यात अडकलीस; तू सापडलीस व पकडण्यात आलीस कारण तू याहवेहस विरोध केला.
२५
याहवेहने आपले शस्त्रागार उघडले व आपल्या क्रोधाचा स्फोट करण्यासाठी शस्त्रे बाहेर काढली, कारण सार्वभौम सर्वसमर्थ याहवेहस बाबेलच्या भूमीवर कार्य करावयाचे आहे.
२६
या! दूरदूरच्या राष्ट्रांमधून बाबेलवर स्वारी करण्यासाठी या! तिची धान्यांची कोठारे फोडा; तिच्या भिंती पाडा, धान्याच्या राशी सारखा तिचा ढिगारा करा. आणि तिचा समूळ नायनाट करा तिच्यातील कोणीही शिल्लक ठेवू नका.
२७
तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे.
२८
बाबेलमधील फरारी व निर्वासित लोक सीयोनात काय म्हणतात ते ऐका याहवेह, आमच्या परमेश्वराने कसा सूड घेतला, त्यांच्या मंदिराबद्दल सूड घेतला. हे याहवेह जाहीर करतात.
२९
“धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,
३०
म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील; त्या दिवशी तिचे सर्व योद्धे निःशब्द होतील,” हे याहवेह जाहीर करतात.
३१
“पाहा, अहो गर्विष्ठ लोकांनो, मीच तुमच्याविरुद्ध आहे आता तुमचा दिवस आला आहे, तुम्हाला शिक्षा देण्याचा समय आला आहे! प्रभू सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
३२
गर्विष्ठ अडखळतील व पडतील, तिला मदतीचा हात देऊन कोणीही उठविणार नाही; मी तिच्या नगरांमध्ये अग्नी पेटवेन तो अग्नी सभोवतालचे सर्वकाही गिळंकृत करेल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options