मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह ४०:७-१२

गदल्याच्या नेतृत्वाखाली उरलेले लोक एकत्र येतात

यिर्मयाह ४०:७-१२
अजूनही मोकळ्या मैदानात असणारे सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने अहीकामचा पुत्र गदल्याहची देशाचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, आणि अत्यंत गरीब असे पुरुष, स्त्रिया व लेकरे व ज्यांना बाबेलास बंदिवासात नेले नाही अशांवर अधिकारी केले आहे. राज्यपाल म्हणून गदल्याहचा पुत्र अहीकामची नेमणूक केली आहे,
तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.
शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल.
१०
मी स्वतः मिस्पाह येथे राहीन. माझ्या कारभाराची पाहणी करावयास बाबिलोनचे अधिकारी येतील, तेव्हा त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन. द्राक्षांचे पीक गोळा करा, उन्हाळी फळे व जैतुनाची फळे गोळा करा व ती साठवून ठेवा. तुमच्या मनाला येईल त्या शहरात राहा.”
११
यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा
१२
तेही जिथे विखरून गेले होते, तिथून यहूदीया प्रांतात मिस्पाह येथे गदल्याहकडे आले. नंतर त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options