मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह २५:१५-२९

देवाच्या क्रोधाचा द्राक्षारसाचा प्याला

यिर्मयाह २५:१५-२९
१५
याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव.
१६
जेव्हा ते यातून पितील तेव्हा ते झोकांड्या खातील व वेडे होतील, कारण मी त्यांच्यावर तलवारीचा प्रहार करेन.”
१७
तेव्हा मी याहवेहच्या हातातून तो प्याला घेतला आणि त्यांनी मला ज्या राष्ट्रांकडे पाठविले, त्या प्रत्येक राष्ट्राला त्यातून प्यावयला लावले:
१८
यरुशलेम व यहूदीयाची नगरे, आणि त्यांचे राजे आणि अधिपती या सर्वांनी पडीक व भयानकतेचे एक उदाहरण, तिरस्कृत व शापित व्हावे—जसे ते आजही आहेत;
१९
इजिप्तचा राजा फारोह व त्याचे सेवक, अधिपती व सर्व लोक, त्या देशात असलेले सर्व परकीय लोक;
२०
त्याचप्रमाणे ऊस देशातील राजे; व पलिष्ट्यांचे राजे (अष्कलोन, गाझा, एक्रोन, अश्दोदचे अवशिष्ट लोक);
२१
एदोम, मोआब व अम्मोन;
२२
तसेच सोर व सीदोन येथील सर्व राजे; समुद्रापलीकडच्या तटवर्तीप्रदेशातील सर्व राजे;
२३
ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात असलेले;
२४
आणि अरबस्थानातील सर्व राजे व वाळवंटात राहणारे विदेशी लोकांचे राजे;
२५
जिम्री, एलाम व मेदिया येथील सर्व राजे;
२६
तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.
२७
“त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’
२८
हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल!
२९
माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options