यशायाह ३३:१४-१९
१४
सीयोनमध्ये असलेले पापी जन घाबरले आहेत; देवहीन लोक थरथर कापत आहेत: “भस्म करणाऱ्या अग्नीमध्ये आमच्यामधील कोण राहू शकेल? सार्वकालिक अग्नीत आमच्यामधील कोण जळत राहू शकेल काय?”
१५
जे नीतीने चालतात आणि जे योग्य तेच बोलतात, जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—
१६
ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल, तेच उच्चस्थानी वास करतील. त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल, आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही.
१७
तुमची दृष्टी राजाला त्यांच्या सौंदर्यात पाहतील आणि फार दूरवर पसरत असलेला देश पाहतील.
१८
तुम्ही यापूर्वीच्या दहशत बसविणाऱ्या गोष्टीचा नीट विचार कराल: “तो मुख्याधिकारी कुठे आहे? ज्याने महसूल कर घेतला, तो कुठे आहे? उंच बुरुजावरील प्रमुख अधिकारी कुठे आहे?”
१९
ज्यांचे बोलणे अस्पष्ट आहे, ज्यांची भाषा अनोळखी आणि न समजण्यासारखी आहे, असे उर्मट लोक तुम्हाला इथूनपुढे दिसणार नाहीत.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.