यशायाह ३४:१-४
१
अहो तुम्ही सर्व राष्ट्रांनो, जवळ या आणि ऐका; लोकांनो! तुम्ही इकडे लक्ष द्या! पृथ्वी आणि तिच्यामध्ये असणाऱ्या सर्वांना हे ऐकू द्या, जग आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या सर्वांना ऐकू द्या!
२
याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत; त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे. ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील, ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील.
३
त्यांच्या वधलेल्यांना बाहेर फेकून देण्यात येईल, त्यांच्या मृतदेहांना दुर्गंधी येईल; पर्वत त्यांच्या रक्ताने भिजून जातील.
४
आकाशातील सर्व तारे विरघळून जातील आणि आकाशे चर्मपत्राच्या गुंडाळीसारखे गुंडाळले जातील; द्राक्षवेलावरील कोमेजलेल्या पानांप्रमाणे, अंजिराच्या झाडावरील सुकून गेलेल्या अंजिरांप्रमाणे सर्व तारांगण गळून पडतील.
Settings