Skip to content
यशायाह ३०:१८-२६

यशायाह ३०:१८-२६

१८
तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात; त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील. कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत. धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!
१९
यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील.
२०
जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल.
२१
तुम्ही जरी उजवीकडे किंवा डावीकडे वळलात तरी तुमच्यामागे तुमच्या कानांवर एक आवाज पडेल, “हाच मार्ग आहे; त्यावर चाल.”
२२
मग तुम्ही तुमच्या चांदीने मढविलेल्या मूर्ती आणि सोन्याने आच्छादित असलेल्या तुमच्या प्रतिमांची विटंबना कराल. तुम्ही त्यांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल आणि त्यांना असे म्हणाल, “आमच्यापासून दूर व्हा!”
२३
तुम्ही जमिनीत जे बीज पेरता, त्यासाठी ते तुमच्याकडे पाऊससुद्धा पाठवतील आणि त्या जमिनीतून येणारे धान्य पौष्टिक आणि विपुल असेल. त्या दिवशी तुमची गुरे विस्तीर्ण कुरणांमध्ये चरतील.
२४
शेतात मशागतीचे काम करणारे बैल आणि गाढवे हे काटे आणि फावड्याने उफणलेला चारा आणि उकडलेले बटाटे खातील.
२५
त्या मोठ्या कत्तलीच्या दिवशी, जेव्हा बुरूज पडतील, तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर आणि प्रत्येक उंच पर्वतावर पाण्याचे प्रवाह वाहतील.
२६
जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options