यशायाह २३:१-७
१
सोरविरुद्ध भविष्यवाणी: तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा! कारण सोरचा नाश झाला आहे आणि तिथे घर किंवा बंदर असे काहीच राहिले नाही. कित्तीम देशाकडून हे वचन त्यांच्याकडे आले आहे.
२
तुम्ही बेटावरील रहिवाशांनो, आणि तुम्ही सीदोनचे व्यापारी, ज्यांना खलाश्यांनी श्रीमंत केले आहे, शांत राहा.
३
प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली.
४
सीदोन आणि समुद्रातील किल्ल्यांनो, लज्जित व्हा, कारण समुद्र म्हणाला: “मला कधीही बाळंतपणाच्या वेदना झाल्या नाहीत आणि मी कधीही प्रसवलो नाही; मी कधीही मुलांचे संगोपन केले नाही किंवा मुलींचा सांभाळ केला नाही.”
५
जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो, तेव्हा सोरकडून आलेल्या वृत्ताने ते कासावीस होतील.
६
तार्शीश ओलांडून पलीकडे जा; बेटावरील लोकहो, आक्रोश करा.
७
ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय, फार जुने, पुरातन नगर, जिच्या पायांनी तिला फार दूर असलेल्या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी नेले आहे?
Settings