Skip to content
होशेय २:१४-२३

होशेय २:१४-२३

१४
“म्हणून तिला मी भुलविणार; तिला रानात घेऊन जाईन आणि तिच्याबरोबर कोमलतेने बोलेन.
१५
तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आणि अखोरचे खोरे तिला आशेचे द्वार असे देईन. जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसात जसे उत्तर देत होती तसेच उत्तर देईल.
१६
“त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल; यापुढे तुम्ही मला ‘माझे बआल’ असे म्हणणार नाही, याहवेह असे घोषित करतात.
१७
मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन; यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही.
१८
त्या दिवशी मी त्यांच्यासाठी रानातील पशू, आकाशातील पक्षी आणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन. धनुष्य आणि तलवार आणि लढाया मी देशातून काढून टाकेन, म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल.
१९
मी तुला माझ्याबरोबर कायमचे वाग्दत्त असे करेन; मी तुम्हाला नीतिमत्व आणि न्याय, प्रीती आणि करुणा यामध्ये वाग्दत्त करेन.
२०
विश्वासूपणाने तुला वाग्दत्त करून घेईन, आणि याहवेहची ओळख तुला होईल.
२१
“त्या दिवशी मी प्रतिसाद देईन; मी आकाशाला प्रतिसाद देईन आणि ते पृथ्वीला प्रतिसाद देतील;” याहवेह अशी घोषणा करतात.
२२
“आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल यांना प्रतिसाद देईल, आणि ते येज्रीलास प्रतिसाद देतील.
२३
मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; ‘माझी प्रिया नाही’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. जे ‘माझे लोक नाहीत,’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options