Skip to content
उत्पत्ती ४६:१-७

उत्पत्ती ४६:१-७

अशा रीतीने इस्राएल आपले सर्वस्व घेऊन निघाला आणि बेअर-शेबा येथे पोहोचल्यावर त्याने आपला पिता इसहाक याच्या परमेश्वराला अर्पणे वाहिली.
त्या रात्री परमेश्वराने इस्राएलला स्वप्नात दर्शन दिले व त्याला म्हटले, “याकोबा! याकोबा!” याकोब म्हणाला, “काय आज्ञा?”
परमेश्वराने म्हटले, “मी परमेश्वर, मी तुझ्या पित्याचा परमेश्वर आहे; खाली इजिप्त देशात जाण्यास भिऊ नको, कारण तिथे मी तुझे एक मोठे राष्ट्र करेन.
मी स्वतः तुझ्याबरोबर खाली इजिप्तला जाईन, आणि तुला तिथून निश्चितच परत आणेन. योसेफाचे हात तुझे डोळे बंद करतील.”
तेव्हा याकोब बेअर-शेबाहून निघाला; त्याला नेण्यासाठी फारोहने पाठविलेल्या गाड्यांमधून इस्राएलाच्या पुत्रांनी, त्याला व आपल्या पत्नींना आणि मुलांबाळांना इजिप्तमध्ये आणले.
मग याकोब त्याची सर्व संतती आणि आपली गुरे व कनान देशामध्ये मिळविलेली संपत्ती घेऊन इजिप्तला गेला.
याप्रमाणे याकोबाने त्याचे पुत्र, नातवंडे आणि त्याच्या मुली आणि नातवंडांना—त्याची सर्व संतती इजिप्तमध्ये आणली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options