Skip to content
उत्पत्ती २९:२-१०

उत्पत्ती २९:२-१०

त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते.
सर्व कळप विहिरीजवळ जमल्यानंतर मेंढपाळ तो दगड लोटत असत आणि सर्व कळपांना पाणी पाजून मग तो दगड विहिरीच्या तोंडावर पुन्हा ठेवीत असत.
याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?” ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”
तेव्हा त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता काय?” “हो, आम्ही ओळखतो,” त्यांनी उत्तर दिले.
यावर याकोबाने त्यांना विचारले, “ते बरे आहेत काय?” “तो बरा आहे, ती पाहा, त्याची कन्या राहेल मेंढरांचा कळप घेऊन इकडेच येत आहे.” ते म्हणाले.
याकोबाने म्हटले, “पाहा सूर्य अजून मावळला नाही; कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झालेली नाही. त्यांना पाणी पाजून पुन्हा चरावयास घेऊन जा.”
आम्ही तसे करू शकत नाही, त्यांनी उत्तर दिले, “सगळे कळप येथे जमल्यानंतर आम्ही विहिरीवरील दगड बाजूला काढतो आणि कळपांना पाणी पाजतो.”
त्यांचे संभाषण चालू असताना राहेल आपल्या पित्याची मेंढरे घेऊन तिथे आली, कारण ती मेंढपाळ होती.
१०
जेव्हा याकोबाने त्याचा मामा लाबानची मुलगी राहेल आणि लाबानाची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने विहिरीच्या तोंडावरील दगड बाजूला केला आणि आपल्या मामाच्या मेंढरांना पाणी पाजले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options