उत्पत्ती २९:१०-१३
१०
जेव्हा याकोबाने त्याचा मामा लाबानची मुलगी राहेल आणि लाबानाची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने विहिरीच्या तोंडावरील दगड बाजूला केला आणि आपल्या मामाच्या मेंढरांना पाणी पाजले.
११
नंतर याकोबाने राहेलचे चुंबन घेतले आणि तो मोठ्याने रडू लागला.
१२
याकोबाने राहेलला सांगितले की तो तिच्या पित्याच्या नात्यातील आहे आणि रिबेकाह हिचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावतच गेली आणि आपल्या पित्याला ही बातमी सांगितली.
१३
लाबानाला आपल्या बहिणीचा मुलगा याकोबाची बातमी कळताच तो त्याला लगबगीने भेटावयाला आला. त्याने त्याला मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले आणि त्याला आपल्या घरी आणले आणि तिथे याकोबाने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या.
Settings