Skip to content
उत्पत्ती २:१६-१७

उत्पत्ती २:१६-१७

१६
याहवेह परमेश्वराने मनुष्याला आज्ञा केली, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ तू खुशाल खा;
१७
परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • रोमकरांस ६:२३

    कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
    वचन १७ मधून
  • याकोब १:१५

    मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती वासना पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली म्हणजे पाप मरणास जन्म देते.
    वचन १७ मधून
  • उत्पत्ती ३:१९

    ज्यामधून तू घडविला गेलास त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत तू घाम गाळून अन्न खाशील, कारण तू माती आहेस आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.”
    वचन १७ मधून
  • कलस्सैकरांस २:१३

    जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली.
    वचन १७ मधून
  • प्रकटीकरण २१:८

    परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”
    वचन १७ मधून
  • 1 करिंथकरांस १५:२२

    कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील
    वचन १७ मधून
  • 1 तीमथ्य ५:६

    परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.
    वचन १७ मधून
  • गलातीकरांस ३:१०

    जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.”
    वचन १७ मधून
  • 1 करिंथकरांस १५:५६

    कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.
    वचन १७ मधून
  • 1 योहान ५:१६

    ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.
    वचन १७ मधून
  • यहेज्केल १८:३२

    कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा!
    वचन १७ मधून
  • उत्पत्ती ३:१७

    नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.
    वचन १७ मधून
All Genesis Sites (Canaan)
All Genesis Sites (Canaan) View full PDF
All Genesis Sites (Middle East)
All Genesis Sites (Middle East) View full PDF
Genesis 2:4-24
Genesis 2:4-24 View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options