उत्पत्ती १५:१५-२१
१५
पण तू चांगला म्हातारा होऊन मरण पावशील व शांतीने तुझ्या पूर्वजांबरोबर पुरला जाशील.
१६
चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही.”
१७
नंतर सूर्य मावळला आणि अंधार पडला तेव्हा अब्रामाने त्या प्राण्यांच्या मृतशरीराच्या दोन ढिगांमधून धुमसते अग्निपात्र आणि पेटलेली मशाल जाताना पाहिली.
१८
त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश—
१९
केनी, कनिज्जी, कदमोनी,
२०
हिथी, परिज्जी, रेफाईम,
२१
अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा देश देत आहे.”
Settings