Skip to content
उत्पत्ती १२:३

उत्पत्ती १२:३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
याहवेहने अब्रामाला सांगितले होते, “तू आपला देश, आपले लोक व आपल्या पित्याचे घर सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.
“मी तुला एक मोठे राष्ट्र करेन, मी तुला आशीर्वाद देईन; आणि तुझे नाव महान करेन आणि तू एक आशीर्वाद असा होशील.
जे तुला आशीर्वाद देतील, त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतील, त्यांना मी शाप देईन; आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”
याहवेहने सूचना केल्याप्रमाणे अब्राम निघाला; आणि लोटही त्याच्याबरोबर गेला. अब्राम हारान येथून निघाला त्यावेळी तो पंचाहत्तर वर्षांचा होता.
अब्राम आपल्याबरोबर आपली पत्नी साराय, त्याचा पुतण्या लोट, तसेच आपली धनदौलत म्हणजे हारानात मिळालेली गुरे व लोक घेऊन निघाला आणि कनान देशात पोहोचला.
अब्राम त्या प्रदेशातून प्रवास करीत शेखेम येथील मोरेहच्या मोठ्या एला वृक्षापर्यंत गेला. त्यावेळी कनानी लोक या देशात राहत होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options