Skip to content
गलातीकरांस २:६-१०

गलातीकरांस २:६-१०

ज्यांना अतिश्रेष्ठ म्हणून मानले जात होते ते काहीही करीत होते तरी मला काही फरक पडला नाही; परमेश्वर पक्षपात करीत नाही. त्यांनी माझ्या संदेशात काहीही भर घातली नाही.
याउलट, त्यांनी ओळखले की सुंता न झालेल्या लोकांमध्ये शुभवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य मला सोपविण्यात आले आहे, ज्याप्रकारे पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये कार्य करण्याचे सोपविण्यात आले होते.
कारण जे परमेश्वर सुंता झालेल्यांसाठी प्रेषित पेत्रामध्ये करीत होते, तेच परमेश्वर गैरयहूदीयांसाठी मी जो प्रेषित आहे त्या माझ्यामध्ये सुद्धा करीत होते.
जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.
१०
त्या सर्वांनी एकच अशी विनंती केली होती की गरिबांना साहाय्य करण्याची आम्ही सतत आठवण ठेवावी आणि तीच गोष्ट करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options