Skip to content
गलातीकरांस २:११-१४

गलातीकरांस २:११-१४

११
जेव्हा केफा अंत्युखिया येथे आला, तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला विरोध केला, कारण तो दोषी होता.
१२
याकोबाकडून काही लोक येण्यापूर्वी तो प्रथम गैरयहूदी लोकांबरोबर भोजन करीत असे. परंतु जेव्हा ते आले, तेव्हा त्याने मागे सरकण्यास सुरुवात केली आणि तो स्वतःला गैरयहूदीयांपासून वेगळे करू लागला, कारण सुंता झालेल्या गटातील लोकांचे त्याला भय वाटत होते.
१३
बाकीचे यहूदी त्याच्या ढोंगात त्याला सामील झाले, म्हणून त्यांच्या ढोंगीपणामुळे बर्णबासचीसुद्धा चुकीची कल्पना झाली.
१४
जेव्हा मी पाहिले की, शुभवार्तेत जे सत्य आहे त्याप्रमाणे ते चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हणालो, “तू यहूदी आहेस तरी तू गैरयहूदीयांसारखे जगत आहेस आणि यहूदीयांसारखे नाही. तर मग हे कसे आहे की, गैरयहूदी लोकांना यहूदी प्रथा पाळण्यासाठी तू भाग पाडतोस?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options