एज्रा १०:६-१५
६
मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.
७
मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे.
८
इस्राएलांच्या पुढार्यांनी आणि वडीलजनांनी असे ठरविले की जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येण्याचे नाकारील तो आपले वतन गमावेल आणि त्याला बंदिवासातून परतलेल्या इस्राएलाच्या सभेतून बहिष्कृत करण्यात येईल.
९
तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.
१०
मग एज्रा याजक उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे, कारण तुम्ही गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले आहेत आणि आपण इस्राएलचे पातक आणखीच वाढविले आहे.
११
आता याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराचा गौरव करा येथून पुढे त्यांच्याच इच्छेप्रमाणे करा. स्वतःला सभोवतालच्या लोकांपासून आणि या गैरयहूदी स्त्रियांपासून वेगळे करा.”
१२
तेव्हा सर्वजण मोठ्याने उत्तर देत म्हणाले: “तुम्ही सांगता ते योग्य आहे! त्याप्रमाणे आम्ही करू.
१३
पण इथे अनेकजण आहेत आणि आता इतका जोरदार पाऊस पडतो आहे की आम्ही येथे बाहेर आपल्या शक्तीने थांबूही शकत नाही. तसेच आम्ही इतके घोर पातक केले आहे की हे सर्व सुरळीत होण्यास एक दोन दिवस पुरेसे होणार नाहीत.
१४
आमच्या पुढार्यांना न्यायदानाची व्यवस्था करू द्या. ज्याला गैरयहूदी पत्नी आहे असा प्रत्येकजण ठरलेल्या वेळी आपल्या नगराचे वडीलजन व न्यायाधीश यांच्यासह येईल. मग परिस्थिती निवळेल आणि आपल्या परमेश्वराचा भयंकर कोप आम्हांपासून दूर होईल.”
१५
फक्त असाहेलचा पुत्र योनाथान, तिकवाहचा पुत्र यहज्याह, ज्यांना मशुल्लाम व शब्बथई लेवी यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी या योजनेला विरोध दर्शविला.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings