यहेज्केल २७:२६-३६
२६
तुझ्या वल्हेकर्यांनी तुला खोल समुद्रात आणले. परंतु त्या खोल समुद्रामध्ये पूर्वेकडील वारा तुझे तुकडे करेल.
२७
तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल, तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे, तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक, आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती समुद्राच्या मधोमध बुडून जातील.
२८
जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील तेव्हा समुद्रतटाचा कंप होईल.
२९
सर्व वल्हेकरी जहाज टाकून देतील; नावाडी आणि सर्व खलाशी किनार्यावर उभे राहतील.
३०
आपला आवाज उंच करून तुझ्यासाठी हेल काढून रडतील; ते आपल्या डोक्यावर धूळ उडवतील व राखेत लोळतील.
३१
तुझ्यासाठी ते आपली डोकी मुंडून गोणपाट नेसतील. ते आपल्या जिवाच्या आकांताने व अति शोकाने तुझ्यासाठी रडतील.
३२
ते तुझ्यासाठी विलाप व शोक करीत असता, ते तुझ्यासाठी विलापगीत गातील: “सोर, जी समुद्रात निःशब्द झाली, तिच्याप्रमाणे अजून कोण आहे?”
३३
जेव्हा तुझा माल समुद्रावरून जात असे, तेव्हा तू पुष्कळ राष्ट्रांना संतुष्ट केले; तुझ्या महान संपत्ती व मालाने पृथ्वीवरील राजांना तू समृद्ध केलेस.
३४
आता तू समुद्राकडून पाण्याच्या खोलीमध्ये तुटून गेली आहेस; तुझा माल व तुझे साथीदार तुझ्याबरोबर खाली बुडले आहेत.
३५
समुद्रतटावर वसलेले तुला पाहून घाबरून जातात; त्यांचे राजे भीतीने कापतात आणि त्यांचे चेहरे भयाने काळवंडले आहेत.
३६
राष्ट्रांचे व्यापारी तुझा धिक्कार करतात; तुझा भयंकर अंत झाला आहे आणि तुझे अस्तित्वच नाहीसे होणार आहे.’ ”
Settings