Skip to content
यहेज्केल १६:४४-५०

यहेज्केल १६:४४-५०

४४
“ ‘प्रत्येक व्यक्ती जे या म्हणींचा उपयोग करतात, ती तुझ्यासाठी हीच म्हण वापरतील: “जशी आई तशी लेक.”
४५
तू तुझ्या आईची खरी मुलगी आहेस, जिने तिच्या नवर्‍याचा व तिच्या लेकरांचा धिक्कार केला; आणि तुझ्या बहिणींची तू सख्खी बहीण आहेस, ज्यांनी त्यांच्या पतींचा व त्यांच्या लेकरांचा धिक्कार केला. तुझी आई हिथी होती आणि तुझा पिता अमोरी होता.
४६
शोमरोन तुझी थोरली बहीण होती, जी आपल्या मुलींसह तुझ्या उत्तरेस राहत होती; आणि तुझ्या दक्षिणेस राहणारी तुझी धाकटी बहीण सदोम आहे.
४७
तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस.
४८
सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, माझ्या जिवाची शपथ, तू व तुझ्या मुलींनी केलेली कृत्ये तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुलींनी केली नाहीत.
४९
“ ‘तुझी बहीण सदोम हिचे अपराध हे होते: ती व तिच्या मुली अहंकारी, खादाड व इतरांची काळजी न करणार्‍या अशा होत्या; त्यांनी गरीब व गरजवंतांना मदत केली नाही.
५०
त्या उन्मत्त असून माझ्यासमोर त्यांनी अमंगळ कृत्ये केली. म्हणून मी त्यांना माझ्यापासून दूर केले ते तर तू पाहिलेच आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options