Skip to content
यहेज्केल १६:३७-४३

यहेज्केल १६:३७-४३

३७
यामुळे ज्यांच्याठायी तुला सुख मिळाले त्या तुझ्या सर्व प्रियकरांना मी एकत्र करेन, ज्यांच्यावर तू प्रेम केले, तसेच ज्यांचा तू वीट केला. मी त्यांना चहूकडून तुझ्याविरुद्ध एकत्र करेन आणि त्यांच्यासमोर तुला नग्न करेन आणि ते तुझी पूर्ण नग्नता पाहतील.
३८
ज्या स्त्रिया व्यभिचार करतात व रक्तपात करतात त्यांची शिक्षा मी तुला देईन; मी आपल्या कोपाने व ईर्ष्येच्या क्रोधाने तुझ्यावर रक्तदोष आणेन.
३९
तेव्हा मी तुला तुझ्या प्रियकरांच्या हाती स्वाधीन करेन आणि ते तुझे घुमट पाडतील आणि तुझ्या उच्च पूजास्थानांचा नाश करतील. ते तुझी वस्त्रे उतरवतील आणि तुझे उत्तम दागिने घेऊन तुला अगदी पूर्णतः नग्न करून सोडतील.
४०
ते तुझ्या विरोधात टोळी आणतील, जे तुला धोंडमार करून आपल्या तलवारीने तुझे तुकडे करतील.
४१
ते तुझी घरे जाळतील व अनेक स्त्रियांदेखत तुला शिक्षा करतील. मी तुझ्या वेश्यावृत्तीचा अंत करेन आणि यापुढे तू तुझ्या प्रियकरांना आणखी वेतन देणार नाहीस.
४२
तेव्हा तुझ्यावरचा माझा कोप शांत होईल आणि माझा ईर्ष्येचा क्रोध निघून जाईल; मी शांत होईन व आणखी रागावणार नाही.
४३
“ ‘तू आपल्या तारुण्यातील दिवसांची आठवण केली नाहीस तर ज्या सर्व कृत्यांनी मला चिडविले, तू केलेल्या कृत्यांचे प्रतिफळ मी खचितच तुझ्या माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तू तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये अश्लीलतेची भर घातली नाही काय?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options