निर्गम २८:५-२९
५
त्यांनी सोन्याचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचा व रेशमी तागाचा वापर करावा.
६
“एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा, कुशल कारागिराच्या हातांनी बनवा.
७
त्याच्या दोन कोपर्यांना दोन खांदेपट्ट्या जोडलेल्या असाव्या, म्हणजे ते बांधता येईल.
८
कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच असावा; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा असावा.
९
“दोन गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावीत.
१०
एका रत्नावर सहा व दुसर्यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार ती असावी.
११
मोलवान रत्ने कोरणारे मुद्रेची कोरणी करतात त्याप्रमाणे तू त्या दोन रत्नांवर इस्राएलांच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावी व ती दोन्ही रत्ने सोन्याच्या जाळीदार साच्यात बसवावी.
१२
आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी.
१३
सोन्याचे खाचे बनव
१४
आणि पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या तयार करून खांदेपट्ट्यांवरील आकड्यात अडकवाव्या.”
१५
“मग निर्णय घेण्यासाठी कुशल कारागिरांकडून ऊरपट तयार करून घ्यावा. एफोदाप्रमाणे सोन्याची जर असलेला, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा असावा.
१६
तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला असावा व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत असावा.
१७
मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी;
१८
दुसर्या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे असावे;
१९
तिसर्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग ही असावीत;
२०
चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे असावीत. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवावीत.
२१
इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने असावीत, प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले जावे.
२२
“ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्या.
२३
ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावण्यासाठी सोन्याच्या दोन कड्या बनवाव्या.
२४
त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये घालाव्या,
२५
आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या.
२६
सोन्याच्या दोन कड्या तयार कर व त्या ऊरपटाच्या दुसर्या दोन कोपर्यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडाव्या.
२७
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या.
२८
ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने, कमरबंदाला जोडतील अशा बांधाव्या, म्हणजे ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.
२९
“अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings