एस्तेर १:३-८
३
त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपल्या सर्व प्रतिष्ठित लोकांना व अधिकार्यांना तिथे भरविलेल्या महोत्सवाचे राजवाड्यात आमंत्रण दिले. या प्रसंगासाठी पर्शिया व मेदियातील लष्करी अधिकारी, सरदार आणि त्या प्रांतातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.
४
सतत 180 दिवस त्याने याच्या साम्राज्याच्या दौलतीचे, महिमा व वैभवाचे प्रदर्शन केले.
५
हे दिवस संपल्यानंतर, राजाने शूशन राजवाड्यातील लहानापासून थोरापर्यंत सर्वांना राजवाड्याच्या अंगणातील बागेत मेजवानी दिली, जी सात दिवस चालली.
६
सजावटीचे पडदे पांढर्या आणि निळ्या रंगांचे होते आणि ते पांढर्या रंगाच्या कापडी फितींनी व जांभळ्या कापडांनी रुपेरी कड्यांना बसविलेल्या संगमरवरी खांबांना बांधलेले होते. संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर सोन्याचे व रुप्याची लाल-जांभळी रत्ने, संगमरवरी, मौल्यवान मोती व इतर रत्नजडित आसने ठेवलेली होती.
७
निरनिराळे नक्षीकाम केलेल्या सुवर्णपात्रांतून पेय दिले जात होते आणि शाही मद्य राजाच्या औदार्यास साजेल असे विपुलतेने दिले जात होते.
८
राजाच्या हुकुमानुसार प्रत्येक पाहुण्याच्या मद्य पिण्यावर कोणतेही बंधन नव्हते, राजाने मद्य वाढणाऱ्या अधिकार्यांना सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येकाला त्याच्या इच्छेस येईल ते मद्य पिण्याची पूर्ण मुभा होती.
Settings