Skip to content
अनुवाद ३३:२०-२९

अनुवाद ३३:२०-२९

२०
गादाविषयी तो म्हणाला: “धन्य आहे गादाचा विस्तार! गाद सिंहासारखा जीवन जगतो, झडप घालून तो भुजा आणि डोके फोडतो.
२१
त्याने स्वतःसाठी सर्वाेत्तम अशी भूमी निवडली आहे; पुढार्‍यासाठी राखून ठेवलेली जमीन त्याला मिळाली आहे. वंशपित्यांच्या सभेत त्याने इस्राएलाकरिता याहवेहच्या नीतिपर इच्छेचे आणि याहवेहच्या न्यायाचे पालन केले.”
२२
दानाविषयी तो म्हणाला: “दान हा सिंहाच्या छाव्यासारखा आहे, बाशानातून तो सिंहासारखी झेप घेतो.”
२३
नफताली विषयी तो म्हणाला: “नफताली याहवेहच्या सर्व आशीर्वादांनी तृप्त आहे आणि त्यांच्या कृपेत परिपूर्ण आहे; तो सागरापर्यंतचा दक्षिण भाग वतन करून घेईल.”
२४
आशेराविषयी तो म्हणाला: “आशेर हा पुत्रांपैकी सर्वात धन्य आहे; त्याला सर्व भावांची कृपादृष्टी प्राप्त होवो आणि त्याचे पाय तेलाने धुतले जावोत.
२५
लोखंड आणि काशांच्या अडसरांनी त्याच्या शहराचे रक्षण होवो, आणि तुझे सामर्थ्य तुझ्या जीवनमानाइतके असो.
२६
“यशुरूनच्या परमेश्वरासमान कोणी नाही, ते आपल्या वैभवाच्या मेघावर आरूढ होऊन, आकाशमंडळातून तुझ्या साहाय्यार्थ धावून येतात.
२७
सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे, आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत. तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात, ‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.
२८
म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्‍या भूमीत तो सुरक्षित राहील.
२९
इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options