अनुवाद ३३:१-५
१
परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.
२
तो म्हणाला: “याहवेह सीनाय पर्वतावरून आले आणि सेईरावर ते सूर्याप्रमाणे उदय पावले; पारान पर्वतावरून ते प्रकाशले. असंख्य पवित्र जनांचा समुदाय त्यांच्याबरोबर होता. दक्षिण दिशेने, त्यांच्या पर्वत उतरणीवरून ते खाली आले.
३
निश्चित तुम्हीच आपल्या लोकांवर प्रीती करता; सर्व पवित्रजन तुमच्या अधीन आहेत. ते तुमच्या चरणाशी नमन करतात, आणि तुमच्याकडून ते आज्ञा स्वीकारतात,
४
मोशेने आम्हाला जे नियम दिले, ते नियम याकोबाच्या सभेचे अमोल वतन आहे.
५
इस्राएलच्या गोत्रांबरोबर जेव्हा इस्राएलच्या लोकांचे पुढारी एकत्र जमले, तेव्हा याहवेह यशुरून लोकांचे राज्यकर्ता झाले.
Settings