Skip to content
अनुवाद २५:८-१९

अनुवाद २५:८-१९

८
तेव्हा त्याच्या नगरातील वडीलजनांनी त्याला बोलावून घ्यावे आणि त्याच्याशी बोलणी करावी. “मला त्या बाईशी लग्न करावयाचे नाही,” असे जर तो हट्टीपणाने म्हणाला.
९
तर त्या विधवेने सर्व वडीलजनासमोर त्याच्याकडे जावे, त्याच्या पायातील पायतण काढून घ्यावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, “जो मनुष्य आपल्या भावाचे घर चालविण्यास नकार देतो, त्याची अशीच गत होते.”
१०
त्याच्या घराण्याचा उल्लेख इस्राएलातील पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असा केला जाईल.
११
समजा दोन पुरुष एकमेकात मारामारी करीत असताना त्या दोघांपैकी एकाची पत्नी आपल्या पतीला मदत करण्यासाठी येते आणि दुसर्‍या मनुष्याचे वृषण पकडते,
१२
तर काहीही दयामाया न दाखविता तुम्ही तिचा हात कापून टाकावा.
१३
तुमच्या झोळीत तुम्ही वेगवेगळी वजने ठेऊ नये—एक जड व एक हलके.
१४
तुमच्या घरात दोन वेगवेगळी मापे वापरू नये—एक मोठे व एक लहान.
१५
तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.
१६
कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्‍यांचा तिरस्कार करतात.
१७
तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर अमालेक लोक तुमच्याशी कसे वागले, हे स्मरण ठेवा.
१८
जेव्हा तुम्ही दुर्बल व थकलेले होता, तेव्हा त्यांनी तुम्हाला मार्गात गाठले आणि मागे राहिलेल्यांवर हल्ला केला; त्यांना परमेश्वराचे भय नव्हते.
१९
जेव्हा वतन म्हणून देणार्‍या देशातील तुमच्या सर्व शत्रूपासून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला विश्रांती देतील, तेव्हा तुम्ही या अमालेक लोकांचे नाव पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष केले पाहिजे. हे तुम्ही कधीही विसरू नये!

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options