प्रेषित ४:१-७
१
पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना याजकगण, मंदिराच्या रक्षकांचा प्रमुख आणि काही सदूकी लोक त्यांच्याकडे आले.
२
ते अत्यंत अस्वस्थ झाले, कारण प्रेषित शिक्षण देत होते व येशूंच्याद्वारे मृतांचे पुनरुत्थान होईल असे लोकांना जाहीरपणे सांगत होते.
३
त्यांनी पेत्र व योहानाला अटक केली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांना दुसर्या दिवशीही कैदेतच ठेवले.
४
त्यांच्यातील अनेकांनी संदेश ऐकला आणि विश्वास ठेवला; म्हणून विश्वास ठेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारापर्यंत गेली.
५
नंतर दुसर्या दिवशी असे झाले की शासक, वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक यरुशलेममध्ये एकत्रित भेटले.
६
महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते.
७
त्यांनी पेत्र व योहान यांना आपल्यासमोर बोलाविले व त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली: “तुम्ही कोणत्या अधिकाराने किंवा कोणाच्या नावाने हे केले आहे?”
Settings