Skip to content
प्रेषित ३:२२-२६

प्रेषित ३:२२-२६

२२
कारण मोशे म्हणाला, ‘प्रभू तुमचे परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील; तो सांगेल ते सर्वकाही तुम्ही ऐका.
२३
जो कोणी संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.’
२४
“खरोखरच, शमुवेल संदेष्ट्याने आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक संदेष्ट्याने आजच्या या दिवसाबद्दल भविष्य सांगितलेले आहे.
२५
तुम्ही संदेष्ट्यांचे वारसदार आहात आणि परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे भागीदार आहात. ते अब्राहामाला म्हणाले, ‘तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.’
२६
परमेश्वराने आपल्या सेवकाला उठविले, तेव्हा प्रथम तुमच्याकडे पाठविले, यासाठी की तुम्हा प्रत्येकाने तुमच्या दुष्ट मार्गापासून मागे वळून आशीर्वादित व्हावे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options