Skip to content
2 शमुवेल ९:७-१३

2 शमुवेल ९:७-१३

दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.”
मेफीबोशेथ दंडवत घालीत म्हणाला, “तुमचा सेवक कोण आहे की, माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याची तुम्ही नोंद घ्यावी?”
नंतर राजाने शौलाचा सेवक सीबा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “शौलाचे व त्याच्या घराण्याचे जे काही होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या नातवाला दिले आहे.
१०
तू, तुझे पुत्र आणि तुझे चाकर यांनी त्याच्यासाठी त्या जमिनीची मशागत करावी आणि तुझ्या धन्याच्या नातवाला पुरवठा असावा म्हणून ते पीक आणावे. आणि मेफीबोशेथ, तुझ्या धन्याचा नातू, नेहमीच माझ्या मेजावर भोजन करेल.” (सीबाची पंधरा मुले आणि वीस चाकर होते.)
११
तेव्हा सीबा राजाला म्हणाला, “माझ्या धनीराजाने आपल्या सेवकाला दिलेल्या आज्ञेनुसार आपला सेवक करेल.” याप्रमाणे राजाच्या पुत्रांसारखा मेफीबोशेथ दावीदाच्या मेजावर भोजन करीत असे.
१२
मेफीबोशेथला मीखा नावाचा एक लहान पुत्र होता आणि सीबाच्या घरातील प्रत्येकजण मेफीबोशेथचे चाकर होते.
१३
आणि मेफीबोशेथ यरुशलेम येथे राहिला कारण तो नेहमी राजाच्या मेजावर भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी अधू होता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options