Skip to content
2 शमुवेल १:१-१०

2 शमुवेल १:१-१०

शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला.
तिसर्‍या दिवशी शौलाच्या छावणीतून एक मनुष्य आला, त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोक्यावर धूळ घातलेली होती. तेव्हा तो दावीदाकडे आला आणि जमिनीवर पालथा पडून दंडवत घातले.
“तू कुठून आला आहेस?” दावीदाने त्याला विचारले. त्याने उत्तर दिले, “मी इस्राएलच्या छावणीतून निसटून पळून आलो आहे.”
दावीदाने विचारले, “काय झाले आहे, ते मला सांग.” त्याने उत्तर दिले, “सैनिक युद्धातून पळून गेले, पुष्कळजण पडले आणि मरण पावले. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे सुद्धा मरण पावले आहेत.”
तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?”
तो तरुण मनुष्य म्हणाला, “मी सहज गिलबोआच्या डोंगरावर होतो आणि तिथे शौल त्याच्या भाल्यावर टेकलेला आणि रथाचा सारथी आणि त्यांचे स्वार जोरात त्याचा पाठलाग करीत होते असे मला दिसले.
जेव्हा तो मागे वळला आणि त्याने मला पाहिले व मला बोलाविले आणि मी म्हणालो, ‘मी काय करू शकतो?’
“त्याने मला विचारले, ‘तू कोण आहेस?’ “ ‘मी अमालेकी आहे.’ मी उत्तर दिले.
“तेव्हा तो मला म्हणाला, ‘येथे माझ्या बाजूला उभा राहा आणि मला मारून टाक! मी मृत्यूच्या यातनेत आहे, परंतु अजूनही मी जिवंतच आहे.’
१०
“तेव्हा मी त्याच्या बाजूला उभा राहिलो आणि त्याला मारून टाकले, कारण मला माहीत होते की, भाल्यावर पडल्याने तो जगू शकला नसता. आणि जो राजमुकुट त्याच्या डोक्यावर होता आणि त्याच्या बाहुंवरचा कडा मी येथे माझ्या धन्याजवळ आणले आहेत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options