Skip to content
2 राजे १८:१-५

2 राजे १८:१-५

इस्राएलचा राजा, एलाहचा पुत्र होशेच्या तिसर्‍या वर्षी, यहूदीयाचा राजा आहाजाचा पुत्र हिज्कीयाह राज्य करू लागला.
हिज्कीयाह पंचवीस वर्षाचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्‍याहची कन्या होती.
त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
त्याने उच्च स्थाने काढून टाकली, पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्याने मोशेने तयार केलेला कास्याच्या सापाचे तुकडे केले, कारण तोपर्यंत इस्राएली लोक त्याच्यापुढे धूप जाळत होते. (त्याला नहुशतान असे म्हणत होते.)
हिज्कीयाहचा याहवेह इस्राएलांच्या परमेश्वरावर भरवसा होता. म्हणून यहूदीयाच्या सर्व राजांमध्ये त्याच्यासारखा कोणीही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर झाला नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options