2 राजे १८:९-१२
९
हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.
१०
तिसर्या वर्षांच्या शेवटी अश्शूरच्या लोकांनी ते घेतले. शोमरोन हे हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी आणि इस्राएलचा राजा होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी ताब्यात घेण्यात आले.
११
मग अश्शूरच्या राजाने इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये नेले व त्यांना हलह येथे, गोजानातील हाबोर नदीकिनारी व मेदिया लोकांच्या नगरात ठेवले.
१२
हे अशासाठी झाले कारण त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराची आज्ञा पाळली नाही व त्यांचा करार मोडला; याहवेहचा सेवक मोशेने जे सर्व आज्ञापिले होते, ते त्यांनी ऐकले नाही किंवा त्याचे पालन केले नाही.
Settings