Skip to content
2 करिंथकरांस ५:१-१०

2 करिंथकरांस ५:१-१०

आम्हास ठाऊक आहे की ज्या ऐहिक तंबू—आमचे शरीर—मध्ये आम्ही राहतो त्याचा जर नाश झाला, तर परमेश्वराने आमच्यासाठी इमारत, सार्वकालिक स्वर्गीय घर जे मानवी हाताने बांधलेले नाही असे तयार केले आहे.
या गृहामध्ये असताना स्वर्गीय गृहाचे पांघरूण घालण्याची इच्छा धरून आपण एवढे कण्हत आहोत.
कारण आम्ही वस्त्रे धारण केली तर नग्न असे सापडणार नाही.
या तंबूमध्ये आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही कण्हतो व थकलेले आहोत, वस्त्रे परिधान करू नये असे आम्हास वाटत नाही, परंतु स्वर्गीय निवासस्थान धारण करावे, यासाठी की जे मर्त्य ते जीवनाने गिळंकृत करावे.
ज्याने आम्हाला या उद्देशासाठीच सिद्ध केले आहे तो परमेश्वर आहे आणि अमानत म्हणून आम्हाला पवित्र आत्मा विसार म्हणून दिला आहे.
यास्तव आता खात्रीपूर्वक आपण जाणून घ्यावे की जोपर्यंत आपण शारीरिक घरामध्ये आहोत, तोपर्यंत आपण प्रभूपासून दूर असतो.
आम्ही विश्वासाने जगतो, प्रत्यक्ष पाहण्याने नव्हे.
आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभूसह आपण आनंदाने वास करावा.
तेव्हा, आम्ही येथे या शरीरामध्ये असू अथवा या शरीरापासून दूर असू, आम्ही करतो त्या सर्व गोष्टींत प्रभूंना संतोष देणे, हेच आमचे ध्येय आहे.
१०
कारण आपल्या सर्वांनाच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहावे लागणार आहे. या शरीरामध्ये असताना प्रत्येकाने ज्या चांगल्या अथवा वाईट गोष्टी केल्या असतील, त्यांचे आपल्यापैकी प्रत्येकाला योग्य ते प्रतिफळ मिळेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options