Skip to content
2 करिंथकरांस ५:११-१५

2 करिंथकरांस ५:११-१५

११
प्रभूची भीती बाळगणे हे काय आहे हे आपणास माहीत आहे, त्यामुळेच इतरांना वळवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो! आम्ही कोण आहोत हे परमेश्वरापुढे स्पष्ट आहे आणि मी आशा धरतो की, तुमच्या विवेकबुद्धीनेही तुम्ही हे निश्चित जाणता.
१२
पुन्हा स्वतःचीच प्रशंसा करण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. तर तुम्हाला आमच्यासाठी अभिमान बाळगण्याची संधी देत आहोत, यासाठी की जे हृदयातील गोष्टींचा नव्हे तर बाह्य गोष्टींचा अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे.
१३
जर “आम्ही वेडे असलो,” जसे काही लोक म्हणतात तर ते परमेश्वरासाठी आहोत. जर आम्ही भानावर असलो, तर ते तुमच्यासाठी आहोत.
१४
ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते कारण आम्हास खात्री आहे की, ज्याअर्थी एक आपल्या सर्वांसाठी मरण पावला तर आपण सर्वजण मेलो आहोत.
१५
ते सर्वांसाठी मरण पावले, म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी यापुढे स्वतःसाठी जगू नये, तर जे त्यांच्यासाठी मरण पावले आणि पुन्हा उठले, त्यांच्यासाठी जगावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options