Skip to content
2 इतिहास ४:११-१८

हूरामाने पितळी पात्रे पूर्ण केली

2 इतिहास ४:११-१८
११
आणि हुरामने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हुरामने परमेश्वराच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले सर्व काम पूर्ण केले:
१२
दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच;
१३
त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्‍या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा);
१४
तिवड्या व त्यांची गंगाळे;
१५
हौद आणि त्याखालील बारा बैल;
१६
भांडी, फावडे, मांस पकडण्याचे काटे, इत्यादी सर्व वस्तू. शलोमोन राजासाठी हुराम-अबीने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.
१७
राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या.
१८
या सर्व वस्तू शलोमोनाने इतक्या बनविल्या होत्या की, कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options