Skip to content
1 शमुवेल ३१:९-१३

1 शमुवेल ३१:९-१३

त्यांनी शौलाचे शिर छेदले आणि त्याचे शस्त्र काढून घेतले आणि त्यांनी ही बातमी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींच्या मंदिरात आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले.
१०
त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शरीर बेथ-शान नगराच्या भिंतीवर टांगले.
११
पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या लोकांनी ऐकले,
१२
तेव्हा त्यांचे सर्व शूरवीर रात्रभर चालून बेथ-शान येथे गेले. त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह बेथ-शानच्या भिंतीवरून खाली उतरविले आणि याबेश येथे आणले व तिथे त्यांनी ते जाळून टाकले.
१३
त्यानंतर त्यांनी त्यांच्या अस्थी याबेश येथे चिंचेच्या झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options