1 शमुवेल ३१:१-७
१
पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले.
२
पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा जोरात पाठलाग केला आणि त्यांनी त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले.
३
शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धरांनी त्याला गाठले व गंभीररित्या जखमी केले.
४
तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला.
५
जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि त्याच्याबरोबर मरण पावला.
६
अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र आणि त्याचा शस्त्रवाहक आणि त्याची सर्व माणसे त्याच दिवशी एकत्र मरण पावले.
७
जेव्हा खोर्याच्या बाजूने आणि यार्देनेच्या पलीकडे असलेल्या इस्राएली लोकांनी पाहिले की, इस्राएली सैन्याने पळ काढला आहे आणि शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची नगरे सोडली आणि तिथून पळून गेले. आणि पलिष्ट्यांनी येऊन तिथे वस्ती केली.
Settings