मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल १९:११-१७

मिखल दावीदाचे प्राण वाचवते

1 शमुवेल १९:११-१७
११
शौलाने दावीदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारावे म्हणून माणसे पाठवली. परंतु दावीदाची पत्नी मीखल हिने त्याला सावध केले, “जर आज रात्री तू आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला नाही तर उद्या सकाळी तू मारला जाशील.”
१२
तेव्हा मीखलने दावीदाला खिडकीतून खाली उतरविले आणि तो पळून गेला.
१३
मीखलने एक मूर्ती घेऊन ती पलंगावर ठेवली, उशाकडे शेळीचे केस लावून ते एका वस्त्राने झाकले.
१४
जेव्हा शौलाने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, तेव्हा मीखल म्हणाली, “तो आजारी आहे.”
१५
तेव्हा शौलाने दावीदाला पाहण्यासाठी माणसे परत पाठवली आणि त्यांना सांगितले, “त्याच्या पलंगासहित त्याला घेऊन या म्हणजे मी त्याला ठार मारेन.”
१६
परंतु जेव्हा माणसे आत गेली, त्यांना दिसले की पलंगावर मूर्ती होती आणि उशाशी शेळीचे केस.
१७
शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसविलेस आणि त्याने पळून जावे म्हणून तू माझ्या शत्रूला का जाऊ दिलेस?” मीखल त्याला म्हणाली, “मला तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, मी तुला का मारावे?’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options