1 राजे १६:३-८
३
म्हणून मी बाशा व त्याच्या घराण्याला नाहीसे करेन आणि मी तुझ्या घराण्याला नेबाटाचा पुत्र यरोबोअम याच्या घराण्यासारखे करेन.
४
बाशाच्या मालकीचा जो कोणी शहरात मरेल त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खातील.”
५
बाशाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली कृत्ये व त्याची यशप्राप्ती, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?
६
बाशा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला तिरजाह येथे पुरले गेले. त्याचा पुत्र एलाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
७
त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.
८
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.
Settings