Skip to content
1 इतिहास ४:९-२०

याबेसाची प्रार्थना

1 इतिहास ४:९-२०
याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक आदरणीय होता; “त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले” असे म्हणत त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले.
१०
याबेसाने इस्राएलाच्या परमेश्वराजवळ प्रार्थना केली, “तुम्ही मला आशीर्वादित करा, माझ्या क्षेत्राचा विस्तार करा! माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन, मला क्लेश वाटू नये म्हणून तुमचा हात माझ्यावर राहो.” परमेश्वराने त्याची विनंती मान्य केली.
११
शूहाहचा भाऊ कलूबला महीर झाला; हा एष्टोनाचा पिता होता.
१२
एष्टोनास बेथ-राफा, पासेआह आणि ईर-नाहाश चा पिता तहिन्ना झाले. हे रेकाह नगरवासी होते.
१३
केनाजचे पुत्र: ओथनिएल व सेरायाह. ओथनिएलाचे पुत्र: हथथ आणि मेयोनोथाय.
१४
मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. सेरायाह योआबाचा पिता होता, हा योआब गे-हाराशीम चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते.
१५
यफुन्नेहचा पुत्र कालेबाचे पुत्र: इरु, एलाह व नाआम. एलाहचा पुत्र: केनाज.
१६
यहल्लेलेलचे पुत्र: जीफ, जीफा, तिर्‍या व असरेल.
१७
एज्राहचे पुत्र: येथेर, मेरेद, एफेर व यालोन. मेरेदची एक पत्नी बिथ्याने मिर्याम, शम्मय व इश्बह यास जन्म दिला. इश्बह एष्टमोवाचा पिता होता.
१८
मेरेदने इजिप्तचा राजा फारोहची राजकन्या बिथ्याशी विवाह केला होता. यहूदाह गोत्रातील त्याच्या पत्नीने गदोरचा पिता येरेद, सोकोहचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथिएल यांना जन्म दिला.
१९
नहमाची बहीण, होदीयाहची पत्नी झाली; तिला: गार्मी येथील कईलाहचा पिता व माकाथी येथील एष्टमोवा झाले.
२०
शिमओनाचे पुत्र: अम्नोन, रिन्नाह, बेन-हानान व तिलोन. इशीचे वंशज: जोहेथ व बेन-जोहेथ.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options