- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
मंदिरातील वादकांची व्यवस्था
1 इतिहास १५:१६-२४
१६
दावीदाने लेवी पुढार्यांना गायकवर्ग व वाद्यवृंद तयार ठेवण्यास सांगितले. या वाद्यवृंदानेः सतार, वीणा व झांजा उच्चस्वराने आणि हर्षाने वाजविल्या.
१७
लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.
१८
पुढे नमूद केलेल्या कुटुंबातील लोक त्यांचे सहायक म्हणून नेमले: जखर्याह, बेन, यजिएल, शमिरामोथ, यहीएल, उन्नी, एलियाब, बेनाइयाह, मासेयाह, मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह. ओबेद-एदोम व ईयेल हे द्वारपाल होते.
१९
संगीतकार हेमान, आसाफ व एथान यांना कास्याच्या झांजा वाजविण्यासाठी नेमले होते.
२०
जखर्याह, अजीएल, शमिरामोथ यहीएल, उन्नी, एलियाब, मासेयाह व बेनाइयाह यांना अलामोथ या संगीत रागावर सारंगी वाजविण्यास नेमले.
२१
मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह, ओबेद-एदोम, ईयेल, व अजज्याह यांना शमीनीथ सुरावर वीणा वाजविण्यास नेमले होते.
२२
लेव्यांचा प्रमुख कनन्याह गायनकर्त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती. तो गायनकलेत निपुण होता.
२३
बेरेख्याह व एलकानाह हे कोशाचे द्वारपाल होते.
२४
शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते.
Settings