मुख्य मजकुरावर जा
1 इतिहास १२:८-१५

गादाचे पराक्रमी योद्धे

1 इतिहास १२:८-१५
गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.
एजेर हा त्यांचा प्रमुख सेनाधिकारी होता. ओबद्याह त्यांचा उपप्रमुख, एलियाब तिसरा,
१०
मिश्मन्नाह चौथा, यिर्मयाह पाचवा,
११
अत्तय सहावा, एलीएल सातवा,
१२
योहानान आठवा, एलजाबाद नववा,
१३
यिर्मयाह दहावा आणि मखबन्नय अकरावा.
१४
हे गाद गोत्राचे असून सैन्यातील अधिकारी होते; त्यातील जो सर्वात कनिष्ठ होता, तो शंभरांच्या तोडीचा होता व सर्वात ज्येष्ठ हजाराच्या तोडीचा.
१५
वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्‍यांत राहणार्‍या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options