1 इतिहास १२:१-१६
१
कीशाचा पुत्र शौलाच्या सानिध्यातून हद्दपार केलेले असताना दावीदाला सिकलाग येथे येऊन मिळालेले योद्धे (ज्यांनी त्याला युद्धात साहाय्य केले त्या योद्ध्यांपैकी असलेले;
२
हे सर्वच धनुर्धारी वीर असून आपल्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारण्यात प्रवीण होते. ते सर्वच बिन्यामीन गोत्रातील आणि शौल राजाचे नातलग होते):
३
त्यातील प्रमुख शमाहाचे पुत्र अहीएजर व त्याचा भाऊ योआश, हे गिबियाहचे रहिवासी होते. अजमावेथचे पुत्र यजिएल व पेलेट, बेराखाह व अनाथोथचा रहिवासी येहू.
४
इश्मायाह हा गिबोनी होता. हा तीस वीरांतील अत्यंत शूरवीर असून त्या तिसांवरील मुख्य होता. यिर्मयाह, यहजिएल, योहानान, गदेराथी योजाबाद,
५
एलूजय, यरिमोथ, बाल्या, शमारियाह व हरूफी शफात्याह,
६
एलकानाह, इश्शीयाह, अजरएल, योबेजर व याशबआम हे सर्व कोरही वंशज होते.
७
योएलाह व जबद्याह हे गदोर येथील यरोहामाचे पुत्र होते.
८
गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.
९
एजेर हा त्यांचा प्रमुख सेनाधिकारी होता. ओबद्याह त्यांचा उपप्रमुख, एलियाब तिसरा,
१०
मिश्मन्नाह चौथा, यिर्मयाह पाचवा,
११
अत्तय सहावा, एलीएल सातवा,
१२
योहानान आठवा, एलजाबाद नववा,
१३
यिर्मयाह दहावा आणि मखबन्नय अकरावा.
१४
हे गाद गोत्राचे असून सैन्यातील अधिकारी होते; त्यातील जो सर्वात कनिष्ठ होता, तो शंभरांच्या तोडीचा होता व सर्वात ज्येष्ठ हजाराच्या तोडीचा.
१५
वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्यांत राहणार्या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली.
१६
बिन्यामीन व यहूदाह गोत्रातील दुसरे काहीजण दावीदाकडे गडावर आले.
Settings